Cheapest Electric Bike: 'ही' बाईक फक्त 115 रुपयात धावते 500 किमी! ! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...
आज आम्ही तुम्हाला अशा इलेक्ट्रिक बाईकची माहिती देणार आहोत, जी केवळ 23 पैशांमध्ये 1 किलोमीटर धावते. ही किंमत कोणत्याही पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकपेक्षा खूपच कमी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही बाईक Joy e-bike Monster. कंपनीचा दावा आहे की, या इलेक्ट्रिक बाईकचा 1 किलोमीटर धावण्याचा खर्च फक्त 23 पैसे आहे. ही बाईक एकदा संपूर्ण चार्ज झाल्यास 95KM ची रेंज देते.
कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक 115 रुपयांमध्ये एकूण 500 KM ड्रायव्हिंग रेंज देईल. यात 72 V, 39 AH लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. बाईक 1500W DC ब्रशलेस हब मोटरद्वारे समर्थित आहे.
जॉय ई-बाईक मॉन्स्टरला पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 ते 5.5 तास लागतात. याची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी 3.3 युनिट वीज वापरली जाते.
याची टॉप स्पीड 60 किमी/तास आहे. या इलेक्ट्रिक बाईकची एक्स-शोरूम किंमत 98,666 रुपये आहे.
भारतीय बाजारात याची स्पर्धा Komaki MX3, Komaki M-5 आणि Revolt Motors RV 400 सारख्या इलेक्ट्रिक बाईकशी आहे.