SUV Car : जबरदस्त एसयूव्ही कार; शानदार मायलेज, फिचर्स आणि किंमतही कमी
Tata Safari ही सात आसनी एसयूव्ही याची किंमत 14.99 लाखांपासून 23.30 लाख रुपये आहे. मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिकमध्ये ही कार उपलब्ध आहे. सफारी 8 रंगांमध्ये उपलब्ध आहे. सफारीचा मायलेज 14.08 ते 16.14 किमी प्रती लीटर इतका आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKia Caren ही सात आसनी RV आहे. ही कारची किंमत 8.99 लाखांपासून सुरू होऊन 16.49 लाख रुपये इतकी किंमत आहे. ही कार दोन इंजिन, 3 ट्रान्समिशन मॅन्यूअल, ऑटोमॅटिक (ड्युअल क्लच) आणि ऑटोमॅटिक (टॉर्क कन्वर्टर) मध्ये उपलब्ध आहे. कॅरेन्स 8 रंगांमध्ये उपलब्ध आहे. कॅरेन्सचा मायलेज 15.7 किमी प्रती लीटर ते 21.3 किमी प्रती लीटर इतका आहे. डिझेल आणि पेट्रोल या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Maruti Suzuki Ertiga ही सात आसनी एमयूव्ही आहे. किंमत 8.11 पासून 10.84 लाख इतकी आहे. एक इंजिन पर्याय आणि 2 ट्रान्समिशन, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (टॉर्क कन्व्हर्टर) सह 7 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही कार पाच रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
Mahindra Bolero Neo ही एक सात आसनी एसयूव्ही याची किंमत 9 लाखांपासून ते 11.34 लाखांपर्यंत आहे. बोलेरो निओ ही कार 6 रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. ही कार 17.29 किमी प्रती लीटर इतका मायलेज देते.
Renault Triber ही सात आसनी एमयूव्ही आहे. याची किंमत 5.67 लाखांपासून ते 8.25 लाख रुपयांपर्यंत आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिकमध्ये ही कार उपलब्ध आहे. ट्राइबर 10 रंगांमध्ये उपलब्ध आहे. ट्राइबरचा मायलेज 18.29 ते 19 किमी प्रती लीटर इतका आहे.
Mahindra Marazzo ही सात आसनी एमयूव्ही कार आहे. याची किंमत 12.79 ते 15 लाखापर्यंत आहे. Marazzo मध्ये 190 लीटरचा बूटस्पेस मिळतो. ही कार चार रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. ही कार 17.33 किमी प्रती लीटर इतका मायलेज देते. ही कार फक्त डिझेल इंजिनसह येते.