इलेक्ट्रिक मोटरसह पेट्रोल इंजिनवर धावते 'ही' कार

कोणतीही कार पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित होण्याआधीचा मधला रस्ता म्हणजे हायब्रीड्स कार. हायब्रीड कारमध्ये दोन प्रकारचे इंजिन असतात, एक सामान्य इंधन इंजिन आणि दुसरे म्हणजे बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मोटर. अशा प्रकारे, या गाड्या एका वेळी पेट्रोल किंवा डिझेलने चालवल्या जाऊ शकतात आणि इतर वेळी इलेक्ट्रिक मोडमध्येही गाडी चालवू शकता. PC : Clinton Pereira
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवीन Lexus NX ही हायब्रीड लक्झरी एसयूव्ही आहे. ज्यामध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स, पॉवरफुल इंजिन दिले आहे. NX ही लेक्ससची सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. भारतात याची स्पर्धा हाय-एंड मिडसाईज SUV शी आहे. PC : Clinton Pereira

नवीन NX ही आधीच्या मॉडेलपेक्षा दिसायला अत्यंत स्टयलिश आणि अग्रेसिव्ह लूक असणारी कार आहे. ही कार आपल्या आधीच्या मॉडेल सारखीच आकाराने मोठी आहे. याच्या समोरील बाजूस एक लोखंडी ग्रील देण्यात आली आहे. याच्या साइड व्ह्यूमध्ये एक लोअर रूफलाईन पाहायला मिळते. याची ही डिझाइन याला एक कूप एसयूव्ही बनते. यात 20 इंचाचे मोठी चाके देण्यात आली आहेत. याच्या मागील बाजूस नवीन LED टेल-लॅम्प्स लाइट बारला जोडल्या आहेत. PC : Clinton Pereira
यात पूर्णपणे नवीन इंटिरिअर देण्यात आला आहे. याच्या केबिनचा दर्जा देखील उच्च श्रेणीतील लक्झरी कार सारखाच आहे. यामध्ये कंपनीने खूप चांगल्या क्वालिटीच्या साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. यात कंपनीने एक नवीन मोठी 14 इंचाची टच स्क्रीन दिली आहे. जी पाहून तुम्ही नक्कीच आकर्षित व्हाल. PC : Clinton Pereira
यातील नवीन टच स्क्रीन जबरदस्त असून याचे रिझोल्यूशन आणि पिंच/झूम फंक्शन क्लीन/शार्प आहे. याचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील डिजिटल आहे. तर ड्राईव्ह मोडसाठी आणि सिस्टिमसाठी एक वेगळी नियंत्रण प्रणाली देण्यात आली आहे. याच्या स्टीयरिंगला कॅपेसिटिव्ह कंट्रोल्स देण्यात आला आहे. PC : Clinton Pereira
ही कार कोणताही आवाज न करता अगदी आरामात सुरू होते. कारण NX पुरेशा चार्जसह फार कमी वेळेसाठी EV मोडमध्ये चालू शकते. याचे हायब्रीड सिस्टीम दोन हाय-टॉर्क इलेक्ट्रिक ड्राइव्ह मोटर-जनरेटरशी जोडलेले आहे. या कारमध्ये 2.5-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याच्या मागील बाजूस AWD सिस्टिम इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. PC : Clinton Pereira
कंपनीने आपल्या नवीन NX ची किंमत 64.90 लाख रुपये इतकी ठेवली आहे. तसेच बातमी दिसत असलेल्या लक्झरी ट्रिमची किंमत 69.50 लाख रुपये आहे. अडॅप्टिव्ह सस्पेंशनसह फ्लॅगशिप F-Sport ची किंमत 71.6 लाख रुपये आहे. PC : Clinton Pereira