Ashadhi wari 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पडुरंगाच्या चरणी सपत्नीक महापूजा; चंद्रभागेच्या वाळवंटी लोटला भक्तीचा जनसागर

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केलीय.

Continues below advertisement

Ashadhi Ekadashi 2025

Continues below advertisement
1/7
Ashadhi wari 2025: आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित आहेत.
2/7
विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिक येथील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली.
3/7
विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिक येथील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली.
4/7
पंढरीच्या आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपुरात साजरा होत आहे. वारकरी मोठ्या संख्येने पंढरीनगरीमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता फडणवीसांसह विठ्ठलाची पूजा केली. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला.
5/7
दरम्यान, चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटी भक्तीचा जनसागर लोटलेला आहे. चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. "जवळपास वीस ते बावीस लाख वारकरी आज आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल झालेले आहेत।" अशी माहिती पुढे आली आहे.
Continues below advertisement
6/7
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
7/7
विठ्ठल मंदिर समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा शाल घालून सन्मान केला. मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. गहिनीनाथ महाराजांनी यावेळी आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
Sponsored Links by Taboola