Ants Facts: मुंग्यांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
घरात सर्वत्र दिसणाऱ्या मुंग्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी येथे आहेत, जे वाचून तुम्हाला धक्का बसेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजरी मुंग्या आकाराने खूप लहान असल्या तरी शिकार किंवा अन्न त्यांच्या स्वत: च्या वजनाच्या कितीतरी पटीने जास्त उचलू शकतील एवढ्या त्या मजबूत असतात.
डायनासोरच्या काळापासून मुंग्या पृथ्वीवर राहतात याची पुष्टी झाली आहे. मुंग्यांची ही प्रजाती पृथ्वीवर 10 दशलक्ष वर्षांहून अधिक काळ जगली आहे.
सुमारे 20 हजार अब्ज मुंग्या पृथ्वीवर राहतात असे म्हणतात. बहुतेक मुंग्या काळ्या, गडद तपकिरी, लाल रंगाच्या असतात
सध्या जगभरात मुंग्यांच्या 15,700 प्रजाती आहेत. सध्या पृथ्वीवर राहणाऱ्या मानवाच्या वजनाच्या 20 टक्के वजन मुंग्यांचं आहे
सहारा वाळवंटात राहणाऱ्या 'सहारन सिल्व्हर' मुंग्या खूप वेगाने चालण्यास सक्षम असतात. मुंगीची ही प्रजाती 90 सेमी प्रति सेकंद प्रवास करते.
अंटार्क्टिका वगळता पृथ्वीवरील प्रत्येक खंडात मुंग्या आढळतात. ग्रीनलँडसारख्या काही बेटांवर मुंग्यांची मूळ प्रजाती नाही, परंतु मानवी प्रवासाद्वारे तिथे काही मुंग्या आणल्या गेल्या आहेत.