Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ढोल ताशाचा गजर, फुलांची उधळण; अनिल देशमुख अखेर तुरुंगाबाहेर
वर्षभरानंतर अनिल देशमुख कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष; सुप्रिया सुळे,अजित पवार उपस्थित
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक वर्ष आणि दोन महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत.
अनिल देशमुख यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही आले होते. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे.
अनिल देशमुख बाहेर येणार, हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्याशिवाय आर्थर रोड तुरुंगाबाहेर कार्यकर्ते जमले होते. देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची उद्या आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. 17 दिवसांच्या स्थगितीत जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात सीबीआयला अपयश आलं. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख यांची सुटका झाली. न्यायालयावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांनी दिली. अनिल देशमुख कारागृहाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल भाऊ आगे बडो, हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा दिल्या.
मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले आहे. परमवीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंह यांनी कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं, त्यामध्ये मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केला होता, माझ्याकडे कोणताही पुरवा नाही असं प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर दिली. यावेळी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याच्यावरही वक्तव्य केलं. त्याशिवाय न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.
1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. वर्षभरानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रसमधील दिग्गज नेते आले होते.