Shravan 2023 : अधिक मास निमित्त पवित्र स्नानाचा आनंद, कौडण्यपुरात भाविकांची मोठी गर्दी
अमरावती : तब्बल 12 वर्षानंतर अधिक मास आणि श्रावण मास एकत्र आल्याने पवित्र स्नानासाठी कौडण्यपुरात भाविकांची मोठ्या संख्येने येथे हजेरी लावताना दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलग तीन वर्षानंतर येणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास निमित्त विदर्भाचे प्रतिपंढरपूरमध्ये सध्या भाविकांची रीघ लागली आहे.
त्यासोबतच, माता रुख्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावतीच्या श्री क्षेत्र कौडण्यपूर येथे हजारो भाविकांची मांदियाळी सध्या पाहायला मिळत आहे.
या महिन्यात तिर्थक्षेत्रावरील पवित्र स्नानाला अधिक महत्त्व असल्याने आद्य तीर्थक्षेत्र असलेल्या कौडण्यपूरच्या वशिष्ठ (वर्धा) नदीपात्रात पवित्र स्नानासाठी भाविकांची पहाटे 5 वाजता पासूनच गर्दी होत आहे.
पवित्र स्नानानंतर भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन, तसेच रुख्मिणी हरण मंदिर म्हणजेच श्री अंबिका माता मंदिर येथे दर्शन घेऊन अधिक मासातील आपले व्रत पूर्ण करतात.
गेल्या महिनाभरापासून भाविक कौडण्यपूरात येऊन आपली आराधना मोठ्या भक्तीभावाने पूर्ण करीत असून सध्या कौडण्यापूरात मोठी यात्रा भरली आहे.
मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल होत आहेत.
पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे.
मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला वैशाख म्हणतात.
कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास म्हणून धरला जातो.
यंदा तब्बल 19 वर्षांनंतर अधिक मास हा श्रावणात आला असून यामुळे रक्षाबंधन लांबणीवर गेले आहे. तसेच चातुर्मासही पाच महिन्यांचा होणार आहे.
17 ऑगस्ट पासून निज श्रावण महिन्याला सुरुवात होत असून श्रावणी सोमवार हे चारच असून 21 ऑगस्टला पहिला सोमवार येणार आहे.
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला (Shravan Mahina) विशेष महत्त्व आहे.
यंदा अधिकमास येत असल्याने हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना (Shravan 2023) सुमारे दोन महिन्यांचा असेल.
18 जुलैपासून ते 16 ऑगस्टपर्यंत अधिक मास असेल.
यंदा नीज श्रावण मास 17ऑगस्टला सुरू होत असून, श्रावणात येणारे सण नीज श्रावणातच साजरे करावेत, असे आवाहन सतीश शुक्ल यांनी केले आहे.