Gajanan Maharaj Prakat Din : दर्यापुरातील विद्यार्थिनीने साकारली गजानन महाराजांची 54 स्क्वेअर फुटांची मनमोहक रांगोळी
श्री संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानिमित्त अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथल्या क्षिती रेवस्कर या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गजानन महाराज यांची रांगोळी साकारली.
श्रींच्या प्रकट दिनानिमित्त 54 स्क्वेअर फूट एवढी भव्य ही रांगोळी साकारली आहे.
या रांगोळीत गजानन महाराज यांनी पंढरीस बापूना काळ्यास विठ्ठल स्वरुपात दर्शन दिले, असा प्रसंग रेखाटला आहे
ही रांगोळी काढण्यासाठी या विद्यार्थिनीला तब्बल 16 तासाचा अवधी लागला.
अशाच प्रकारच्या रांगोळी क्षितीने नवरात्र, गणपती, दिपावली, दसरा निमित्ताने विविध रांगोळ्या साकारलेल्या होत्या.
गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे.
महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील जवळपास एक हजारांच्या वर दिंड्यांसह लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत.
श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते.
महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराज यांच्यामुळे नावारुपाला आले आहे.