Amravati News : भाजपच्या अमृत कलश यात्रेला सुरुवात! 360 गावं, 6 विधानसभा अन् 3 हजार 660 किलोमीटरचा प्रवास
Amravati Amrut Kalash Yatra : अमरावतीत आजपासून भाजपच्या अमृत कलश यात्रेला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही अमृत कलश यात्रा अमरावती जिल्ह्यात 360 गावांमध्ये फिरणार आहे.
सहा विधानसभा आणि 3 हजार 660 किलोमीटरचा प्रवास अशी या अमृत कलश यात्रेची रूपरेषा असणार आहे.
या यात्रेचा शुभारंभ आज इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून करण्यात आला.
'मेरी माटी, मेरा देश' अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात अमृत कलश यात्रा काढली जाईल.
यावेळी भाजपचे विविधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सहा विधानसभा मतदारसंघातील अमृत कलश यात्रेसाठी सहा आकर्षक रथांची सजावट करण्यात आली आहे.
या रथांना भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि यात्रा सुरु झाली.
सहा विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये ही अमृत कलश यात्रा जाईल.
या ठिकाणची माती रथांमधील अमृतकलशामध्ये टाकली जाणार आहे.
सहाही विधानसभा क्षेत्रातील रथांमधील माती दिल्लीच्या अमृत उद्यानमध्ये नेली जाईल.
ही यात्रा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ, प्रेरणास्थळ, शहीद स्मारक, महापुरुषांची जन्मगावे इत्यादी ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी वीरमानवांना मानवंदन केलं जाईल.