PHOTO: अमरावतीत किन्नरांची भव्य कलश यात्रा, राष्ट्रीय किन्नर संमेलनासाठी देशभरातील हजारो तृतीयपंथी दाखल
अमरावती शहरात तब्बल 50 वर्षानंतर राष्ट्रीय किन्नर संमेलन 3 ते 11 जानेवारी पर्यंत आयोजित केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज किन्नरांसाठी महत्वाचा दिवस आहे.
अमरावती शहरातून देशभरातून आलेले किन्नर सजून डजून या कलश यात्रेत सहभागी झाले.
यावेळी अनेक किन्नरांनी एक ते दीड किलो सोन्याचे दागिने परिधान करून या कलश यात्रेत सहभागी झाले.
कलश यात्रेसाठी गंग्रोत्रीवरून गंगाजल आणण्यात आले आहे. शहरातून कलश यात्रेनं भ्रमंती केली.
सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, कोरोनासारखी महामारी कायमस्वरूपी हद्दपार व्हावी, ज्यांना नोकऱ्या नाही त्यांना नोकरी मिळो, यासाठी ही कलशयात्रा काढण्यात आली
तसेच ज्यांना मुलं-बाळं होत नाही त्यांच्यासाठी आणि अमरावती वासीयांचं आरोग्य उत्तम राहो यासाठी ही कलश यात्रा असल्याचं सहभागी किन्नरांनी सांगितलं.
अमरावतीत राष्ट्रीय किन्नर संमेलनासाठी देशभरातील हजारो तृतीयपंथी दाखल झाले आहेत.
कलश यात्रेत अंदाजे दोन हजार तृतीयपंथी सहभागी झाले.
हे सर्व फोटो मनीष जगताप यांनी काढले आहेत