अमरावतीच्या रेवसामध्ये उसळला भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतला एकाच वेळी महाप्रसादाचा लाभ,मनमोहक दृश्य ड्रोनमध्ये कैद
अमरावती जिल्ह्यातील श्री संत ब्रह्मचारी महाराजांची पुण्यतिथी यात्रा महोत्सव सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंत ब्रह्मचारी महाराजांचा 154 वा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे.
17 जानेवारीला महाप्रसादाचे कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व कानाकोपऱ्यातून आले.
गोपाला गोपालाच्या गजरात हजारो भाविक भक्तांची हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.
अमरावती श्री क्षेत्र रेवसा येथील महाप्रसादाचे वितरण हे दूरवर प्रसिद्ध आहे.
महाप्रसाद नव्हे तर या ठिकाणी भक्त पोटभर जेवण करून तृप्त होऊन जातात.
विशेष म्हणजे याठिकाणी एकच पंगतीमध्ये हजारो भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात.
या महाप्रसादाच्या आयोजन आणि नियोजनाचे संपूर्ण विदर्भभर कौतुक होत आहे.
यात्रेचं मनमोहक दृष्य अमरावतीचे अक्षय इंगोले यांनी टिपले आहे
हजारो भाविकांनी घेतला एकाच वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे
दरवर्षी लाखो भाविक या यात्रेसाठी येतात . (सर्व ड्रोन सौजन्य - अक्षय इंगोले)