काय झाडी, काय डोंगर, चिखलदरात पर्यटकांची जत्रा...
विदर्भाचे नंदनवन समजल जाणारं अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा पावसामुळे कसं बहरल हे पाहुयात..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसात ते आठ दिवस सतत पाऊस पडल्याने मेळघाटचं सोंदर्य बहरलं आहे.
सध्या चिखलदरा येथे पर्यटकांची जणू जत्राच भरली आहे...
दऱ्या खोऱ्यात वसलेलं चिखलदरा आणि देशातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प ही याच ठिकाणी आहे..
नुकताच मुसळधार पाऊस येऊन गेल्याने चिखलदऱ्यावर संपूर्ण धुक्याची चादर पसरल्याने वातावरण आल्हाददायक झालं आहे.
या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी हजरोंच्या संख्येत पर्यटक आता मेळघाट मधील चिखलदरा येथे येऊ लागले..
सद्या राज्यात सगळीकडे पाऊस पडतोय.. या पावसामुळे चिखलदर्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.. हिरवीगार उंच झाडे, त्यात सकाळच्या वेळी पडलेलं धूक..
सद्या या ठिकानी पर्यटनाला सुरुवात झाली असल्याने.. सकाळची नयनरम्य धुक्याची दृश्य बघण्यासाठी पर्यटक सकाळी चिखलदरा येथे दाखल होत आहे. देवी पॉईंट जवळ पर्यटकांची तुफान गर्दी करताहेत..
चिखलदरा येथील भीमकुंडचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतेय..
पावसाळा सुरू झाल्याने सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे पर्यटक मनमुराद आनंद घेताय...