अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या हातरुण गावात एकाच समाजाच्या दोन गटात मोठा क्षुल्लक कारणावरून वाद उफाळला. वादानंतर दोन्ही गट आमने-सामने येऊन मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संतप्त जमावाकडून यावेळी एक चारचाकी वाहन पेटवण्यात आलं असून या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. तर, दोन्ही गटातील काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

या दुर्घनटेनंतर सहा जखमींवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून हातरून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून एक गट दुसऱ्यावर गटावर धावून गेल्यानंतर ही घटना घडली.
पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका गटातील काही जणांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढविला. त्यानंतर दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. एका वाहनाची जाळपोळ देखील करण्यात आली.
या घटनेत जवळपास 6 जण जखमी झाल्याची माहिती असून सर्व जखमींवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये एका जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर हातरून गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी आत्तापर्यंत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, दोन्ही गटाला शांत करण्यात पोलीस व स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.