Tiger: तहान भागवण्यासाठी वाघ कृत्रीम पाणवठ्यावर! पाहा मेळघाटातील रुबाबदार वाघाची दृश्य
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या शहानूरमध्ये गेल्या महिन्यापासून अनेकदा अनेक वन्य प्राण्यांचं दर्शन घडतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोट तालुक्यातील शहानूर, नरनाळा आणि बोरी हा भाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येतोय.
हा भाग सातपुडा पर्वत रांगामध्ये आहे.
पर्यटकांसह वनविभागा'च्या कर्मचाऱ्यांना वाघ आणि इतर वन्य प्राणी दिसण्याचा योग अनेकवेळा दिसून येत आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शहानुर इथे जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक येत आहे.
या वेळी बिबट्यासह अस्वलाचं दर्शन घडलंय. आज या भागात पर्यटकांचा ओघ वाढतोय.
दरम्यान, या भागातील नदी, नाले, जलस्रोत आटण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे जंगलात बांधण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर वन्यप्राणी पाणी प्यायला येताना दिसत आहे.
जंगलाचा राजा 'वाघ' कृत्रिम पाणवठ्यात बसून उन्हापासून आपलं संरक्षण करताना दिसत आहे.
ही दृश्य खास 'एबीपी माझा'च्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेयेत आमचे प्रेक्षक मुश्ताक पटेल' यांनी...