Akola News : घराचा पाया खोदतांना ऐतिहासिक ठेवा सापडला; अकोल्याच्या मुर्तिजापूरमध्ये धन सापडल्याच्या चर्चेने एकच खळबळ

Akola News : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालूक्यातल्या तुरखेड येथे घराचा पाया खोदतांना काही इतिहासकालीन नाण्यांचा मोठा खजिना सापडलाय.

Akola News

1/7
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालूक्यातल्या तुरखेड येथे घराचा पाया खोदतांना काही इतिहासकालीन नाण्यांचा मोठा खजिना सापडलाय.
2/7
गावातील ठाकरे कुटूंबियांच्या घराचं सध्या बांधकाम सुरू आहे. यावेळी घरासाठी जेसीबीने पाया खोदतांना जमिनीत इतिहासकालीन नाण्यांचा मोठा खजिना निघालाय.
3/7
साधारणत: हा खजिना 10 ते 15 किलो नाण्यांचा असल्याची प्राथमिक माहिती गावचे माजी सरपंच अखिल भटकर यांनी दिलीये.
4/7
ही नाणी मुघलकालीन असल्याचा अंदाज वर्तविला जातोये. या नाण्यांवर अरबी भाषेतील मजकूर लिहिलाय.
5/7
खोदकामात ही नाणी मिळाल्याची बातमी कळल्यानंतर गावात धन सापडल्याची अफवा फैलल्याने मोठी गर्दी झालीय.
6/7
गर्दीतील अनेकांनी सोन्याची नाणी समजत ती घरी नेल्याचीही चर्चा आहे.
7/7
याप्रकरणी सर्व नाणी सरकारने जमा करून ती केव्हाची आहे हे स्पष्ट करण्याची मागणी तुरखेडवाशियांनी केलीये.
Sponsored Links by Taboola