बारामतीतील विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात; लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, कंपनीची मान्यता रद्द व्हावी यासाठी मुरलीधर मोहोळ यांना भाजपचे पत्र

Aircraft Accident in Baramati: बारामतीतील विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात झाला असून लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, झाल्याने हा अपघात झालाय.

Aircraft Accident in Baramati

1/6
Aircraft Accident in Baramati: बारामतीतील विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
2/6
विमान लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
3/6
लँडिंग करताना पुढचं चाक वाकड झाल्याने हा विमान अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर रेड बर्ड या प्रशिक्षण संस्थेचे हे विमान होते.
4/6
पुढे आलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
5/6
रेड बर्ड या कंपनीची मान्यता रद्द व्हावी, असे पत्र काहीच दिवसापूर्वी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आलं होतं. रेड बर्ड या विमानाचा सातत्याने अपघात होत आहे. त्यामुळे हे निष्काळजीपूर्वक प्रशिक्षण देतात अशी भाजप युवा मोर्चाचे म्हणणं आहे.
6/6
त्यामुळे त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीने राज्यमंत्री यांच्याकडं करण्यात होती. आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा किरकोळ अपघात झाला.
Sponsored Links by Taboola