वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, झाडे उन्मळून पडली, दुकानांचे पत्रे उडाले, नागरिकांची उडाली धांदल

Rahta Rain Update: राहता तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यांमुळे घराचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली.

Continues below advertisement

Rain

Continues below advertisement
1/6
आज दुपारच्या सुमारास राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत
2/6
अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, पूर्वमोसमी पावसाचीही हजेरी लागली.
3/6
साकुरी गावात अनेक वर्षे जुने वडाचे झाड ग्रामदैवत विरभद्र महाराजांच्या मंदिरावर पडल्याची घटना घडली आहे..
4/6
वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की रस्त्याच्या कडेला असलेली झाडेही जागच्या जागी उन्मळून पडली. अनेक दुकानांचे पत्रे उडून शेजारच्या इमारतींवर गेले.
5/6
या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी वाऱ्याच्या तडाख्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे चिंता वाढली आहे.
Continues below advertisement
6/6
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडवल्याचे बघायला मिळाले...
Sponsored Links by Taboola