Ahmednagar : युवा शेतकऱ्यानं केली पिवळ्या कलिंगडाची लागवड, शहरी भागात मोठी मागणी
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील शेतकरी युवा शेतकरी संजय रोडे यांनी पिवळ्या कलिंगडाची लागवड (Cultivation Watermelon) करत चांगलं उत्पन्न घेतलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे कलिंगड दिसायला वेगळं असल्यानं याला जास्त दर मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं त्यांना यातून शाश्वत दर मिळाला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील युवा शेतकरी संजय रोडे यांनी पारंपरिक शेती न करता पिवळ्या रंगांच्या कलिंगडाची लागवड केली आहे.
आपल्या दीड एकर शेतात पिवळ्या कलिंगडाची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी एका खासगी कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केलं आहे.
संजय रोडे यांनी आपल्या दीड एकर शेतात आरोही, विशाला आणि सरस्वती या वाणाच्या कलिंगडाची लागवड केली आहे. दीड एकरात त्यांनी 12 हजार रोपे लावली आहेत. यासाठी त्यांना 70 ते 75 हजारांचा खर्च आला आहे.
सरस्वती हे आकाराने गोल कलिंगड आहे. त्याची साल ही गडद हिरव्या रंगाची असून हे कलिंगड आतून गडद लाल रंगाचे निघते.
आरोही वाणाचे कलिंगड हे बाहेरुन हिरव्या रंगाचे असून ते आतून पिवळ्या रंगाचे निघते. दिसायला वेगळेपण असल्यानं या कलिंगडांना शहरी भागात अधिक मागणी असते.
संजय रोडे यांनी वेगळ्या कलिंगडाची लागवड केल्यास त्यांना पारंपरिक पिकापेक्षा अधिक फायदा होऊ शकतो असा सल्ला परिसरातीलच कृषी सेवा केंद्र चालक शैलेश ढवळे यांनी दिला
लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत त्यांनीच संजय रोडे यांना मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे या कलिंगडावर खूप कमी प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करावा लागत असल्याचे शैलेश ढवळे यांनी सांगितलं.