Innovation : सात महिन्यांची मेहनत, 65 हजार रुपये खर्च, कोपरगावच्या पोरांनी शेतकऱ्यांसाठी बनवलं भन्नाट यंत्र
Ahmednagar News : कोपरगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी पेरणी यंत्र बनवले आहे.
Continues below advertisement
Kopargaon sowing Machines
Continues below advertisement
1/10
शेतकऱ्यांना पेरणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत कोपरगाव मधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी पेरणी यंत्र बनवले आहे.
2/10
या यंत्राला देशपातळीवर झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे मजूर मिळत नसताना आणि वेळ वाचविण्यासाठी यंत्राचा मोठा उपयोग भविष्यात बळीराजाला होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
3/10
देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतीपूरक तयार केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा नुकतीच पार पडली.
4/10
देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतीपूरक तयार केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा नुकतीच सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसई) या जागतिक संस्थेच्या भारतातील एक्सपर्ट इंडिया संस्थेमार्फत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात घेण्यात आली.
5/10
यात कोपरगावमधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्वयंचलित बहुपयोगी रोप पेरणी यंत्राने अव्वल स्थान पटकावून देश पातळीवर यश मिळवले आहे..
Continues below advertisement
6/10
दुसऱ्या, तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या 25 जणांच्या टीमने हा प्रकल्प पूर्ण केला असून एकाच वेळी टोमॅटो, मिरची, वांगी यासह विविध रोपांसाठी दोन सऱ्या पाडून त्या सऱ्यांच्या मधील भरवशावर रोपाची लागवड होणार आहे.
7/10
याचबरोबर रोपाभोवती मल्चींगपेपर अंथरत रोपाच्या शेजारून ठिबक सिंचनाची नळीही पसरली जाऊ शकते, अशी माहिती तुषार घुमरे म्हणाला या विद्यार्थ्यांने दिली आहे.
8/10
हे यंत्र बनविण्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून मेहनत घेतली आहे. हे यंत्र तयार करण्यासाठी जवळपास 65 हजार रुपये खर्च आला आहे.. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्व्हे करून हे यंत्र तयार केलं आहे.
9/10
देशभरातील 28 संघ अंतिम फेरीत आले होते. त्यात शेवटच्या फेरीत 15 संघात झालेल्या स्पर्धेत संजीवनीला यश मिळालं असल्याच शिक्षक इमरान सय्यद यांनी सांगितलं आहे.
10/10
माझे आई वडील शेतकरी असून आमची 25 एकर शेती करताना मजूर मिळत नव्हते. त्यामुळे आज यंत्र बनविल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी काही तरी केलं, हे सांगायला अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया ईश्वरी शिंदे या मुलीने दिली आहे.
Published at : 09 Jun 2023 08:04 PM (IST)