Ram Navami 2023 : शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, साई मंदिर रात्रभर खुले राहणार
साईबाबांनी सुरु केलेला रामनवमी उत्सव आजही शिर्डीत मोठ्या उत्साहात पार पडत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्यापासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सुरुवात होत आहे.
उद्या पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीनंतर उत्सवाला प्रारंभ होणार आहे.
30 मार्च रोजी रामनवमीला उत्सवाचा मुख्य दिवस आहे.
संभाव्य गर्दी लक्षात घेता साईभक्तांना दर्शनासाठी रामनवमीला साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.
या तीन दिवसीय रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो पालख्यांसह दरवर्षी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होतात.
उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पाडतात.
मुंबई येथील भक्ताने भव्य अस प्रवेशद्वार उभारले आहे.
वाढते तापमान लक्षात घेऊन साईबाबा संस्थानने ठिकठिकाणी साईभक्तांच्या सुविधेसाठी मांडव उभारले आहेत.