Satyajeet Tambe & Amol Khatal : कट्टर विरोधक सत्यजीत तांबे अन् अमोल खताळ एकत्र, गणरायाची केली सोबत आरती; पाहा PHOTOS

Satyajeet Tambe & Amol Khatal : एकमेकांवर टीकेची एकही संधी न सोडणारे सत्यजीत तांबे आणि अमोल खताळ एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Continues below advertisement

Satyajeet Tambe & Amol Khatal

Continues below advertisement
1/7
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार अमोल खताळ व थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे या दोघात श्रेय वादाची लढाई मतदारसंघात दिसून आली.
2/7
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार अमोल खताळ एकाच ठिकाणी आले.
3/7
विशेष म्हणजे या दोघांनी एकमेकांच्या हाताला हात लावून गणरायाची आरती केली.
4/7
संगमनेर शहरातील बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने दोन्ही आमदारांना आरतीचे निमंत्रण देण्यात आले होते.
5/7
सत्यजीत तांबे आणि अमोल खताळ या दोन्ही आमदारांनी हाताला हात लावून केलेल्या आरतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Continues below advertisement
6/7
एकमेकांवर टीकेची एकही संधी दोन्ही नेत्यांनी सोडलेली नाही.
7/7
त्यातच दोन्ही आमदार एकत्र आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. दोन्ही आमदारांच्या एकत्र येण्याने संगमनेरमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
Sponsored Links by Taboola