शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी, देशभरातून जवळपास सात लाख भाविक दाखल होण्याची शक्यता
अमावस्या शनिवारी आली असल्याने अहमदनगरच्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक हे शनिशिंगणापूर येथे शनीदेवाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत
जवळपास सात लाख भाविक हे शनिशिंगणापूर येथे शनीदेवाच्या दर्शनासाठी दाखल होतील अशी शक्यता देवस्थानच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
शिर्डीपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेले शनी शिंगणापूर मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे
संपूर्ण भारतातील स्थानिक लोक आणि भाविकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे
शनी शिंगणापूर हे एकमेव गाव म्हणून जगभरात ओळखले जाते जिथे घरांना दरवाजे तसेच कुलूप बसवलेले नाहीत
शनि शिंगणापूर मंदिरातील शनिदेवाची मूर्ती खुल्या आकाशाखाली आहे
आज सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitri Amavasya 2023) सोबतच सूर्यग्रहण (Surya Grahan) आणि शनि अमावस्येचा योगायोग आहे.
त्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे