Sangamner News: 'आमचा तालुका बिबटेमुक्त करा', सत्यजित तांबे, जयश्री थोरात उतरले रस्त्यावर; संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा, PHOTO

Sangamner News: बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

Continues below advertisement

Sangamner News

Continues below advertisement
1/10
संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
2/10
शहरासह तालुक्यातील विविध गावांतील नागरिक, शेतकरी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
3/10
हा मोर्चा थेट संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला.
4/10
मोर्चात आमदार सत्यजित तांबे आणि जयश्री थोरात यांनी सहभाग घेतला होता.
5/10
गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा संताप मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement
6/10
बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत असून नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.
7/10
विशेषतः शाळकरी मुलांवर बिबट्यांचे हल्ले वाढले असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
8/10
या परिस्थितीमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळेस नागरिकांनी घराबाहेर निघणे बंद केले आहे.
9/10
मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाकडे संगमनेर तालुका बिबटेमुक्त करा, अशी मागणी केली.
10/10
प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकवटलेल्या नागरिकांनी वनविभाग व प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्या, अशी देखील मागणी केली आहे.
Sponsored Links by Taboola