Ahmednagar News: विधानसभेपूर्वी पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनःर्वसन करा, नाहीतर...; बीडमध्ये झळकलेल्या बॅनरनं भाजपचं टेन्शन वाढणार?
Maharashtra Ahmadnagar News: अहमदनगर : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर बीडमध्ये मोठा तणाव पाहायला मिळत आहे. बीडमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर मात्र, त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगरच्या पांगरमल येथील माजी सरपंच बाप्पुसाहेब आव्हाड यांनी पांढरीपूल फाटा येथे पंकजा मुंडे यांच्याबाबत लावलेल्या बॅनरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
सरकारनं जर येत्या विधानसभा मतदानापूर्वी पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनःर्वसन केलं नाही, तर सकल ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीसह सत्तेत असणऱ्या कोणत्याही पक्षास मतदान करणार नाही, अशा आशयाचे बॅनर अहमदनगरच्या पांगरमल येथे लावण्यात आले आहेत.
सोबतच पक्षासाठी आणि समाजासाठी ज्यांचं योगदान नाही, त्यांना राज्यसभा देऊन मंत्रिपद दिलं जातं, मात्र पंकजा मुंडे यांना डावललं जातं, असं म्हणत कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत बीडचा निकाल अत्यंत धक्कादायक होता. बीडमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला.
मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी दणदणीत विजय मिळवला.
बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय पक्का असल्याचं बोललं जात होतं. मात्र, चुरशीच्या लढतीत पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला.
बीडमधील निकाल स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यावरुन सध्या संपूर्ण मराठवाड्यात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बीडचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर आरोपीनं फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह पोस्ट लिहिली.