PHOTO : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने तब्बल 9 टन बुंदीच्या लाडूचा प्रसाद बनवला
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिरिक्त भोजन व्यवस्थेसह साई भक्तांसाठी तब्बल 9 टन बुंदीचा लाडू प्रसाद बनवण्यात आला आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असतात.
तर शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांची लाडू प्रसादाला विशेष पसंती असते.
20 रुपयांत 3 लाडू मिळत असल्याने लाडू पाकिट घेण्यासाठी साई भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात.
यावर्षी नवीन वर्षानिमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून तब्बल 9 टन बुंदी लाडू प्रसाद बनवण्यात आला आहे.
संस्थानच्या विविध स्टॉलवर हा प्रसाद भाविकांना उपलब्ध होणार आहे.
साई मंदिरात गेलात आणि लाडूचा प्रसाद घेतला नाही तर तुमची शिर्डीची ट्रिप वाया गेली समजा.
हे लाडू शुद्ध तूप, ड्रायफ्रूट्स, मणुके आणि बेसनच्या बुंदीपासून बनवलेले असतात.
हे लाडू अतिशय चविष्ट असतात आणि कमी किमतीत मिळतात.