शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?
शिर्डीतील साईबाबा मंदिर हे जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून वर्षभरात लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरात भेट देऊन साईंचे दर्शन घेतात. सबका मालिक एक असल्याने सर्वधर्मीय बांधव येथे दर्शनासाठी येतात
Continues below advertisement
Shirdi saibaba gold plate donate
Continues below advertisement
1/8
शिर्डीतील साईबाबा मंदिर हे जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून वर्षभरात लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरात भेट देऊन साईंचे दर्शन घेतात. सबका मालिक एक असल्याने सर्वधर्मीय बांधव येथे दर्शनासाठी गर्दी करतात
2/8
शिर्डीच्या साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भक्तांची अपार श्रद्धा असल्याने याच श्रद्धेच्या भावनेतून भाविक सतत साईचरणी विवीध स्वरूपात दान अर्पण करत असतात.
3/8
आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवतात, इच्छापूर्ती झाल्याने आपल्या स्वइच्छेने साईचरणी मौल्यवान वस्तू अर्पणही केल्या जातात. त्यामध्ये, सोनं, चांदी यासह रोख, चेक स्वरुपातही रक्कम असते.
4/8
ठाणे येथील हिर रिअल्टी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे धरम कटारिया यांनी आज साईबाबांच्या चरणी 660 ग्रॅम वजनाचे आकर्षक सुवर्ण ताट अर्पण केलं आहे.
5/8
साईचरणी अर्पण करण्यात आलेल्या या सुवर्ण ताटाची किंमत तब्बल 74 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. ही देणगी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या स्वाधीन करण्यात आली.
Continues below advertisement
6/8
धरम कटारिया यांनी आपल्या पत्नीसमवेत साईबाबांचे दर्शन घेत साईचरणी हे ताट अर्पण केले, येथील पुजाऱ्याने हे ताट साईंच्या चरणावर ठेऊन परत दिले, ते संस्थानकडे जमा केले.
7/8
साईबाबांच्या चरणी सुवर्ण ताट अर्पण केल्यानंतर संस्थानच्या वतीने गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त धरम कटारिया यांचा सत्कार करून त्यांच्या देणगीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
8/8
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजमित्तीस सोनं प्रति तोळा 1 लाख 24 हजारांवर पोहोचलं आहे.
Published at : 09 Oct 2025 07:16 PM (IST)