कर्जतमधील सभेनंतर मनोज जरांगे कोपर्डीत; निर्भयाच्या समाधीस्थळाचं दर्शन, निर्भयाच्या दोषींना फाशी द्या; जरांगेंचा पुनरूच्चार
कर्जतमधील सभेनंतर मनोज जरांगेंकडून कोपर्डीतील निर्भयाच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन कुटुंबाची विचारपूस केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिर्भयाला लवकर न्याय द्या, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, असं म्हणत मनोज जरांगेंनी आपल्या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे भेट देऊन निर्भयाच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतलं.
मनोज जरांगेंनी निर्भयाच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपपूसही केली.
निर्भयाच्या घटनेला सात वर्ष उलटूनही अत्याचार करणाऱ्या नराधमाना फाशी दिली गेली नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मराठा आंदोलनात ही महत्वाची मागणी होती, मात्र अत्याचार करणाऱ्या नराधमांना कधीपर्यंत पोसणार आहात, असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला आहे.
निर्भयाच्या समाधी स्थळाचं दर्शन घेताना निर्भयाच्या काकांना अश्रू अनावर झाले होते.
निर्भयाच्या काकांनी थेट जरांगे पाटलांचे पाय धरले, तसेच, निर्भयाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यासाठी प्रयत्न करावेत, असंही यावेळी निर्भयाच्या चुलत्यांनी सांगितलं.