Mahashivratri 2023 : शिर्डीत भक्तांसाठी महाशिवरात्रीनिमित्त साडे पाच टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद
आज राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. ठिकठिकाणी भगवान शंकराच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाशिवरात्रीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी साबुदाणा खिचडी आणि झिरक याचा महाप्रसाद ठेवण्यात आला.
आज महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीच्या साईप्रसादालयात तब्बल साडेपाच हजार किलो साबुदाणा वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली.
आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र या दोन दिवशी साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात येत असतो.
आज खिचडी सोबतच शेंगदाणा झिरक सुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आलं.
महाशिवरात्र निमित्त येणाऱ्या साईभक्तांना असणारा उपवास लक्षात घेता साई संस्थानकडूनही जय्यत तयारी करण्यात आली.
आज दिवसभरात जवळपास 50 ते 60 हजार भाविक साईप्रसादाला येतील अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादालयात हा साडेपाच हजार किलोचा साबुदाणा वापरून खिचडी तयार करण्यात आली आहे.
साईबाबांच्या समाधीवरसुद्धा याच खिचडीचा प्रसाद दाखवण्यात येतो.