Shirdi Gudi Padwa: शिर्डीतील साईबाबा मंदिरावर गुढीची उभारणी, साईबाबांना परिधान करण्यात आली साखरेच्या गाठीची माळ
साईबाबांच्या शिर्डीतही मराठी नववर्षाचे स्वागत मंदिरावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून करण्यात आलंय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाईबाबा संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर येर्लागड्डा यांच्या हस्ते सपत्नीक गुढीचे विधीवत पुजन करण्यात आले.
त्यानंतर साईबाबांच्या मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली आहे.
सर्व धर्म समभावाची शिकवण देणा-या साईबाबांच्या शिर्डीत वर्षभरातील प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरी करण्याची परंपरा आहे.
आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
आज साईबाबांच्या मुर्तीला कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आली आहे.
साईदर्शनाने नववर्षाची सुरूवात करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे
राज्यभरात गुढीपाडव्यानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे
प्रत्येकजण आनंदाची, सुखसमृद्धी, आणि भरभराटीची गुढीही उभारत आहे
. मुंबईसह पुणे,कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळतोय.