Ahilyabai Holkar Jayanti 2023: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती, चोंडीतील भजन किर्तनाच्या कार्यक्रमात रमले आमदार रोहित पवार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांची 298 वी जयंती त्यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे आज पार पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोठ्या संख्येने अहिल्याप्रेमी चौंडीत दाखल होत आहेत. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून नागरीक आले आहेत
दरम्यान कर्जत - जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दर्शन घेतलं. त्यानंतर भजन, किर्तनात ते रमले.
दरम्यान आमदार रोहित पवार यांनी काल रात्रीच स्वतंत्र जयंतीचा कार्यक्रम साजरा केला
भाजप आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर टीका करताना म्हंटले होते कुणीतर वेगळा पायंडा पडून स्वतःचे अस्तिव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि राजकारण करू नये.
यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, त्यांना केवळ राजकारणच दिसते आम्ही काल धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम साजरा केला ज्यामुळे लोकांना आनंद मिळाला
चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आलीय.
रोहित पवार यांनी महाप्रसादाचे देखील या वेळी वाटप केले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने मतदारसंघातील जोडप्यांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक करण्यात आला. या महापूजेसाठी देखील ते उपस्थित होते
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी झाला. त्यामुळे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे