PHOTO : शिर्डीच्या साईचरणी कोट्यवधीचं दान
शिर्डीतील साई मंदिरात पार पडलेल्या गुरुपौर्णिम उत्सावात साईचरणी कोट्यवधीचं दान प्राप्त झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्सवाच्या तीन दिवसा साई भक्तांनी पाच कोटी 12 लाख रुपयांचं भरभरुन दान दिलं.
या उत्सवात तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं.
भाविकांनी दिलेल्या दानाची आज मोजदाद करण्यात आली.
त्यानुसार गुरुपौर्णिमा उत्सवात साई चरणी एकूण 5 कोटी 12 लाख रुपयांचे दान प्राप्त झालं.
दानपेटी - 2 कोटी 17 लाख, देणगी काऊंटर - 1 कोटी 59 लाख, ऑनलाईन डोनेशन - 1 कोटी 36 लाख रुपये जमा झाले.
तर 12 देशांचे 19 लाखांचे परकीय चलन, 22 लाख 14 हजारांचे 479 ग्रॅम सोने आणि 3 लाख 22 हजार रुपये किमतीची 6 किलो 800 ग्रॅम चांदी अर्पण करण्यात आली.
शिर्डीतील साई मंदिरात 12 ते 14 या काळात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणाऱ्यात आला. शेवटच्या दिवशी दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष साईभक्तांना उत्सवात सहभागी होता येत नव्हते. मात्र, यावर्षी भाविकांनी भर पावसातही मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.