Radhakrishna Vikhe Patil: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट दर्ग्यात प्रार्थना
आत्तापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे भावी मुख्यमंत्री फ्लेक्स राज्यभर झळकल्याच आपण पाहिलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट दर्ग्यावरच प्रार्थना केल्याचं दिसून आलंय
संगमनेर शहरातील ख्वाजा पीर मोहम्मद दर्ग्यात विखेंच्या उपस्थितीत काल ही प्रार्थना करण्यात आली.
हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक असलेल्या ख्वाजा पीर मोहम्मद यांचा सध्या उरूस सुरू आहे
या उरुसाला भेट देण्यासाठी विखे पाटील संगमनेरात आले होते.
यावेळी दर्ग्यावर चादर अर्पण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी 2024 ला विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातच भावी मुख्यमंत्री म्हणून विखेंसाठी केलेली प्रार्थना चर्चेचा विषय ठरतेय.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून जोरदार चर्चा होती. नगरमध्ये तसे बॅनरही लागले होते.