Sangamner News: झेंडुच्या फुलशेतीतून बळीराजाला आधार, अवघे शेत बहरले सोन्यासारख्या पिवळ्या फुलांनी
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडीचे शेतकरी बंधूना झेंडूच्या शेतीतून मोठं आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फुलांना प्रतिकिलोला 80 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे.
संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील ज्ञानेश्वर आणि निवृत्ती बाळकृष्ण सहाणे या शेतकरी बंधूंनी तीन एकर क्षेत्रात अप्सरा पिवळ्या झेंडूची लागवड केली होती
आता ही शेती फुलली असून जणूकाही पिवळ्या सोन्याची खाणच दिसत आहे.
सध्या या फुलांना प्रतिकिलो 75 ते 80 रुपयांचा भाव मिळत असून यातून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा बळीराजाला आहे.
ज्ञानेश्वर व निवृत्ती सहाणे हे सख्खे बंधू शेतीत नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करत आले.
त्यांना अवघी चार एकर शेती असूनही ते तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या बळावर चांगले उत्पन्न काढत आहेत.
सध्या त्यांनी तीन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरवर अप्सरा पिवळ्या झेंडूची लागवड केली आणि अवघ्या 37 दिवसांत फुले काढणीस सुरुवात झाली
विशेष म्हणजे शेतकरी ज्ञानेश्वर यांची पत्नी ज्योती आणइ निवृत्ती यांची पत्नी निशीगंधा या आपल्या पतीला भक्कम साथ देत शेती करत आहेत.
दरम्यान, मागील वर्षीही एकाच मल्चिंग पेपरवर दोडका, कलिंगड, टोमॅटो ही पिके घेण्याचा करिष्मा केला आहे. तेव्हाही चांगले बाजारभाव मिळाले होते.
प्रत्येकवेळी बाजारपेठ, वातावरण आणि नवीन पीक घेण्यात हे शेतकरी बंधू तरबेज झाले आहेत.