Ahmednagar News : एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी 600 जावयांचं कौतुक, अहमदनगरमध्ये एकत्रित केलं जावयाचं धोंडे जेवण
यासंबंधीचा प्रस्ताव देवस्थान समितीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरुवातील यामध्ये फक्त आगडगावमधील जावयांचं एकत्रित धोंडे जेवण घालण्याचं ठरवण्यात आलं होतं.
मात्र या विषयाची चर्चा आजूबाजूच्या खेडेगावामध्ये झाल्याने अनेकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
आपल्या जावयाला देवस्थानच्याच धोंडे जेवणात सहभागी करुन घेण्याची विनंती अनेकांनी देवस्थानच्या समितीला केली.
बघता बघता 600 जावयांची नोंद या धोंडे जेवणासाठी घेण्यात आली.
या धोंडे जेवणात सर्व जावयांना आणि लेकींना देवस्थान ट्रस्टच्या वतीने कपडे ,साडी आणि दहा ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात आले.
यामध्ये साडेसात हजार किलोचे पुरण तसेच भात, आमटी आणि धोंडे तयार करण्यात आले होते.
या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाची इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे
तर दरवर्षी अशाच प्रकारचे धोंडे जेवण करावे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
त्यामुळे या धोंडे जेवणाची चर्चा पंचक्रोशीमध्ये सुरु आहे.