राहुरीत फायटर जेटमधून पडलेला 'तो' जिवंत बॉम्ब अखेर निष्क्रिय, पुढे काय होणार? समोर आली मोठी अपडेट

Ahilyanagar News : राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे फायटर जेटमधून जिवंत बॉम्ब पडल्याची घटना घडली होती. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Ahilyanagar News

1/9
राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे फायटर जेट विमानातून पडलेला जिवंत बॉम्ब सात फूट खड्ड्यातून वर काढण्यात आलाय.
2/9
पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड पथकाने बॉम्बचा स्फोट होऊ नये म्हणून तो निष्क्रिय केलाय.
3/9
हा बॉम्ब आता के. के. रेंज येथे नेऊन त्याचा विस्फोट करण्यात येणार आहे.
4/9
वरवंडी येथे 24 एप्रिलला फायटर जेट विमानातून बॉम्ब पडल्याची घटना झाली होती.
5/9
बॉम्ब पडल्यानंतर चार-पाच दिवसांनी वायुसेना आणि संरक्षणच्या पथकांनी घटनास्थळी पाहणी केली होती.
6/9
त्यावेळी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
7/9
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि वायुसेना पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
8/9
आता वायुसेनेच्या परवानगीने हा बॉम्ब निष्क्रिय करण्यात आलाय.
9/9
हा आता बॉम्ब नगरला नेण्यात येणार असून नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक एक तास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
Sponsored Links by Taboola