हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी; शॉर्ट सर्किटच्या अफवेमुळे गोंधळ!
हरि की पौडी येथे स्नान केल्यानंतर भाविक मानसा देवी मंदिर दर्शनासाठी शिवालिक टेकड्यांवरील पायऱ्यांवरून जात होते. पुढे रस्ता अरुंद होत गेल्याने गर्दी वाढली अन्..
मानसा देवी मंदिर
1/8
हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात रविवारी चेंगराचेंगरी झाली, ज्यात 8 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी झाले. शॉर्ट सर्किटची अफवा पसरल्याने गर्दीचा गोंधळ उडाला त्यामुळे ही दुर्घटना घडली.
2/8
हरि की पौडी येथे स्नान केल्यानंतर भाविक मानसा देवी मंदिर दर्शनासाठी शिवालिक टेकड्यांवरील पायऱ्यांवरून जात होते. पुढे रस्ता अरुंद होत गेल्याने गर्दी वाढली,मंदिरात जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था आणि पदपथ देखील बनवण्यात आला आहे.
3/8
गर्दी वाढल्यावर नियंत्रण सुटले आणि भाविक घाबरून पळू लागले, त्यामुळे जवळच्या दुकानांचे शटरही वाकडे झाले. विजेचा धक्का बसल्याची अफवा असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, पण पोलिसांनी ती अफवा फेटाळली.
4/8
मंदिरात येण्यासाठी आणि जाण्यासाठी दोरीने वेगवेगळे मार्ग दाखवले गेले होते, पण बाहेर जाण्यासाठी योग्य व्यवस्था नव्हती. त्यामुळे हजारो भाविक एकाच पायऱ्यांवरून आत येत आणि बाहेर जात होते, ज्यामुळे गर्दीचा गोंधळ झाला.
5/8
मंदिर समितीचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी म्हणाले की जबाबदारी माझी नाही,आम्ही फक्त लोकांना वाचवले. मात्र, मंदिरात कॅमेरे असूनही प्रशासनाला गर्दीबद्दल वेळेवर माहिती दिली नाही, त्यामुळे योग्य वेळी उपाययोजना करता आली नाही.
6/8
मनसा देवी मंदिराचा परिसर राजाजी पार्क विभागाच्या अखत्यारीत येतो. अपघातानंतर वन विभागाचे अधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष एकमेकांवर जबाबदारी टाकत असून, वन विभागाने चौकशीचे कारण देत प्रश्न टाळले.
7/8
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून कोणतीही चूक झाली नाही आणि भाविकांची संख्या त्यांनी आधीच अंदाजे केली होती, कारण रस्तेही त्यांच्या अखत्यारीत होते. मात्र वेळेवर योग्य पावले न उचलल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि आता वन विभाग चौकशीची वाट पाहत आहे.
8/8
श्रावण महिन्यात विशेषतः सुट्टीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होणे अपेक्षित असतानाही प्रशासनाने वेळेवर तयारी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. गर्दी नियंत्रणासाठी सिंगल रूट व्यवस्था आधीच लागू का केली गेली नाही, यावरही शंका निर्माण झाली आहे.
Published at : 28 Jul 2025 02:38 PM (IST)