Joint pain : सांधेदुखीची कारणे आणि लक्षणे: महिलांसाठी विशेष माहिती

महिलांमध्ये विशेषतः रजोनिवृत्तीनंतर हार्मोनल बदल, स्नायूंची कमजोरी आणि जीवनशैलीमुळे सांधेदुखी जास्त दिसते. निरोगी वजन, व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य उपचारांमुळे वेदना आणि कडकपणा कमी करता येतो.

महिलांमध्ये विशेषतः रजोनिवृत्तीनंतर हार्मोनल बदल, स्नायूंची कमजोरी आणि जीवनशैलीमुळे सांधेदुखी जास्त दिसते. Joint pain (photo credit : pinterest )

1/11
सांधेदुखी किंवा ऑस्टियोआर्थरायटिस आता फक्त वृद्ध लोकांमध्ये नाही, तर इतर वयोगटातही दिसत आहे. तज्ञ म्हणतात की ही समस्या महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतेय आणि रजोनिवृत्तीनंतर ही अजून वाढते.
2/11
महिलांमध्ये होणारे हार्मोन बदल ह्याचे मुख्य कारण आहे , हाडे आणि सांध्याची रचना आणि वाईट जीवनशैली.
3/11
रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन कमी झाल्याने महिलांमध्ये सांधेदुखीचा धोका वाढतो.
4/11
महिलांचे स्नायू कमजोर आणि सांधे जास्त लवचिक असल्यामुळे हाडांवर जास्त ताण येतो. त्यामुळे त्यांना पुरुषांपेक्षा सांधेदुखी होण्याची शक्यता जास्त असते.
5/11
डॉक्टरांच्या मते, महिलांच्या कंबरेची हाडे गुडघ्यांवर दबाव आणतात, ज्यामुळे वजन उचलणाऱ्या सांध्यांवर परिणाम होतो. रजोनिवृत्तीनंतर लठ्ठपणाचा धोका वाढल्याने सांध्यांवर दबाव आणखी वाढतो.
6/11
महिलांमध्ये या समस्या आनुवंशिक कारणांमुळेही होऊ शकतात. ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये सांधेदुखी, कडकपणा आणि सूज दिसते.
7/11
सुरुवातीला फक्त हलकी वेदना किंवा कडकपणा होतो, पण नंतर ही समस्या वाढल्यास रोजच्या कामांनाही त्रास होऊ लागतो.
8/11
निरोगी वजन ठेवणे आणि नियमित व्यायाम केल्यास सांध्यांवर ताण कमी होतो. ओमेगा-3 कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेला आहार हाडे आणि सांधे मजबूत ठेवतो.
9/11
महिलांनी जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखर कमी खावीत. योग्य बसण्याची पद्धत, योग्य पाठ पाठिंबा आणि तणाव टाळल्यास सांधेदुखी कमी होऊ शकते.
10/11
ऑस्टियोआर्थरायटिसवर कायमस्वरूपी उपाय नाहीत, पण फिजिओथेरपी, स्ट्रेचिंग, गरम/थंड पॅक, वेदनाशामक आणि काही इंजेक्शनने वेदना आणि कडकपणा कमी होऊ शकतो.
11/11
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola