'या' सोप्या टिप्स नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढवू शकतात, जाणून घ्या!
गर्भावस्थेतल्या छोट्या सवयी, प्रसूती मोठ्या प्रमाणात सोपी करतात.
Continues below advertisement
नॉर्मल डिलिव्हरी
Continues below advertisement
1/8
नॉर्मल डिलिव्हरीसाठी गर्भवती महिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन केल्यास प्रसूती अधिक सुलभ होऊ शकते.
2/8
नियमित चालणे, हलका व्यायाम, पेल्विक फ्लोअरचे (Kegel) व्यायाम आणि प्रेग्नंसी योगामुळे शरीर लवचिक राहते आणि लेबरच्या वेळी लागणारी ताकद वाढते.
3/8
योग्य श्वासोच्छ्वास तंत्रांचा सराव जसे डीप ब्रीदिंग आणि लॅमाझ—वेदना नियंत्रित ठेवण्यास आणि शांत राहण्यास मदत करतो.
4/8
आहारात प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम आणि फायबरयुक्त अन्नाचा समावेश केल्याने ऊर्जा व हिमोग्लोबिन पातळी चांगली राखली जाते.
5/8
पुरेसे पाणी पिणे आणि द्रव पदार्थ घेणे देखील आवश्यक आहे, कारण हायड्रेशनमुळे गर्भाशयाची कार्यक्षमता सुधारते.
Continues below advertisement
6/8
मानसिक तयारीही तितकीच महत्त्वाची मेडिटेशन, शांत संगीत आणि सकारात्मक विचार यामुळे भीती आणि तणाव कमी होतो.
7/8
डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वजन राखणे, बर्थ-बॉल व्यायाम किंवा हलके स्क्वॉट्स करणे पेल्विक भाग लवचिक ठेवते आणि बाळाचे पोझिशन योग्य होण्यास मदत करते.
8/8
जास्त वेळ बसून किंवा आडवे न राहता दिवसातून थोडे-थोडे चालणे लेबर सुरळीत ठेवू शकते. बेबीचे हेड-डाउन पोझिशन आणि आईचे सर्व पॅरामिटर्स तपासण्यासाठी नियमित फॉलो-अप खूप आवश्यक आहे. तसेच पुरेशी झोप घेतल्याने आणि शरीराला विश्रांती दिल्याने लेबरमध्ये लागणारी शक्ती टिकून राहते. अशा या सर्व गोष्टींचे पालन केल्यास नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता अधिक वाढू शकते.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 04 Dec 2025 12:08 PM (IST)