काही वर्षांनी रोबोटसोबत शारीरिक संबंध ठेवू शकतील महिला; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक संशोधनानं सर्वांना हैराण केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येकाच्या शारीरिक गरजा असतात. अशातच स्त्री-पुरूष दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण होण, हा निसर्गाचा नियमच आहे.
मनुष्य असो वा प्राणी, निसर्गाच्या चक्रानुसार प्रत्येकाच्याच शारीरिक गरजा असतात. ज्याच्या अंतर्गत भिन्न लिंगांचे दोन सजीव एकमेकांकडे आकर्षित होतात आणि एकमेकांच्या शारीरिक गरजा भागवतात.
आजपर्यंत आपण स्त्री पुरुषांमधील लैंगिक संबंधांबद्दल आपण ऐकलं आहे. पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की, महिला रोबोटसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकणार आहेत.
आश्चर्याचा धक्का बसला ना? येत्या काळात महिला रोबोटसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकणार आहे. असं आम्ही नाही, तर एका संशोधनातून समोर आलं आहे.
ब्रिटीश दैनिक द सनच्या वृत्तानुसार, भविष्य सांगणारे तज्ज्ञ डॉ. पीअरसन म्हणतात की, पुढील 10 वर्षांत महिला त्यांच्या लैंगिक गरजा पुरुषांकडून नव्हे तर, रोबोटकडून पूर्ण करताना दिसतील.
इतकंच नाही तर 2025 पर्यंत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी श्रीमंतांच्या घरात अनेक रोबोट आणले जातील, असा दावाही पिअर्सन यांनी केला आहे.
पिअर्सन म्हणाले की, मानवानं रोबोट्सशी संबंध निर्माण करण्याच्या मार्गावर आधीपासूनच सुरुवात केली आहे, ज्याची उदाहरणं सेक्स टॉय आणि व्हायब्रेटर आहेत. पोर्नोग्राफीमुळे लवकरच महिला रोबोटसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी स्वतःहून पुडाकार घेतील.
पीअरसननं भाकीत केलं की, 2050 पर्यंत रोबोट्ससोबत शारीरिक संबंध सामान्य होतील. मानव हळूहळू प्रेम आणि आपुलकी विसरून जातील आणि रोबोटशी शारीरिक संबंध ठेवण्याची सवय होईल.
इंटरनेट शॉप बोंडाराद्वारे सादर केलेल्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, रोबोट फिजिक्सबद्दल अजूनही अनेकांना संशय आहे, परंतु हळूहळू लोकांना याची सवय होईल आणि त्यांना हे सर्व सामान्य वाटू लागेल.
(टिप : वरील गोष्टी एका संशोधनाच्या आधारावर आम्ही केवळ माहिती म्हणून देत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)