लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आता आजाराला करा बाय-बाय; 'या' 5 गोष्टींचा आहारात करा समावेश

Winter Health Tips : बदलत्या वातावरणामुळे आजारपण खूप वाढलेलं आहे. याचा सगळ्यात जास्त परिणाम लहान मुलांवर आणि घरातील वयोवृद्ध व्यक्तींवर होतो. अशा वेळी तुम्ही या 5 गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.

Continues below advertisement

Winter Health Tips

Continues below advertisement
1/9
थंडीच्या दिवसांत वातावरणातील बदल आणि प्रदूषणामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते यामुळे लगेच आजारपण येतं. इतकंच नाही तर हेल्दी डाएट करणारे लोकसुद्धा यामुळे आजारी पडतात.
2/9
जर वारंवार सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारखे आजार होत असतील तर समजून जा की तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत चालली आहे. यासाठी तुम्हाला आहारात या पाच गोष्टींचा नक्कीच समावेश केला पाहिजे, ज्यांच्यामुळे शरीराला आजाराशी लढण्याची शक्ती मिळेल.
3/9
आयुर्वेद एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार थंडीत प्रदूषण आणि इन्फेक्शनमुळे लोक सतत आजारी पडतात. अशातच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नैसर्गिक मध, शुद्ध तूप, मुक्ता पंचामृत या गोष्टींचा समावेश आहारात करावा. याशिवाय काही घरगुती उपायसुद्धा जाणून घेऊयात.
4/9
आवळा : तुम्ही आहारात आवळ्याचा समावेश करू शकता. थंडीमध्ये खोकला होऊ नये या भीतीने लोक आवळा खाणं टाळतात. पण, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तुम्ही आवळ्याचा रस, चटणी, लोणचं बनवून खाऊ शकता.
5/9
तुळस: तुळशीचा समावेष दैनंदिन जीवनात करू शकता. तुळस सर्दी- खोकला यावर गुणकारी आहे. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवते. हलक्या गरम पाण्याबरोबर दोन ते तीन तुळशीची पाने चावून खावी किंवा तुळशीचा चहा बनवून पिऊ शकता.
Continues below advertisement
6/9
हळदी आणि काळीमिरी : हे सुद्धा ऊर्जेचं उत्तम सोर्स आहे. हळदीचे गरम दूध आणि त्यात थोडीशी काळीमिरी पूड घातल्याने शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थंडीच्या वातावरणात ऊर्जा मिळते.
7/9
अमृतवेल : अमृतवेल ही एक अशी वनस्पती आहे जिचा वापर प्राचीन काळापासून अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जायचा. याचा काढा बनवून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
8/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
9/9
तसेच काही गोष्टी टाळाव्यात ज्यामुळे तुम्हाला आजाराशी सामना करावा लागू शकतो जसे की, कैफीन, साखर कमी करावी आणि महत्त्वाचे म्हणजे जंक फूडचे प्रमाण कमी करावे. कारण या गोष्टी रोग प्रतिकार शक्ती कमी करण्यासाठी जबाबदार असतात.
Sponsored Links by Taboola