Winter Bathing Tips : हिवाळ्यात कोणते पाणी आंघोळीसाठी योग्य गरम, थंड की कोमट?

Winter Bathing Tips : हिवाळ्यात सकाळी आंघोळ करताना गरम किंवा थंड पाण्याने नुकसान होऊ शकते, त्यामुळे तज्ज्ञांच्या मते कोमट पाणी वापरावे आणि नंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे.

Continues below advertisement

Winter Bathing Tips

Continues below advertisement
1/9
हिवाळ्यात सकाळी उठल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न असतो आंघोळ करायची का आणि केली तर गरम की थंड पाण्याने?
2/9
तज्ज्ञांच्या मते, अतिशय गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज येऊ शकते.
3/9
थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान अचानक कमी होते आणि त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता निर्माण होते.
4/9
हे हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींकरिता विशेषत धोकादायक ठरू शकते, कारण त्याचा शरीरावर त्वरित परिणाम होऊ शकतो.
5/9
डॉक्टरांच्या मते, कोमट पाणी हे हिवाळ्यात आंघोळीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
Continues below advertisement
6/9
ते शरीराला आतून उबदार ठेवते आणि त्वचेवरील नैसर्गिक तेलाचे संरक्षण करून नुकसान होऊ देत नाही.
7/9
आंघोळीनंतर त्वचा कोरडी होऊ नये म्हणून तिला मऊ आणि हाइड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे अत्यंत आवश्यक असते.
8/9
म्हणून हिवाळ्यात थंड किंवा खूप गरम नाही, तर कोमट पाण्याची आंघोळच योग्य ठरते.
9/9
(टीप: वरील माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola