सकाळचा नाश्ता टाळताय? मग हे तोटे नक्की वाचा!

सकाळचा नाश्ता म्हणजे दिवसाची ऊर्जा देणारा पहिला आहार. झोपेतून उठल्यानंतर शरीरात साखरेचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि मेंदूला काम करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते.

नाश्ता

1/9
सकाळचा नाश्ता म्हणजे दिवसाची ऊर्जा देणारा पहिला आहार
2/9
झोपेतून उठल्यानंतर शरीरात साखरेचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि मेंदूला काम करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते.
3/9
पण बऱ्याच वेळा वेळेअभावी, डायटिंगच्या नादात किंवा सवयीमुळे लोक नाश्ता टाळतात.
4/9
हे टाळणं शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. नाश्ता न केल्यास दिवसभर थकवा जाणवतो, मूड चिडचिडा होतो, लक्ष केंद्रित करणं कठीण जातं.
5/9
पचनक्रियेवरही ताण येतो आणि गॅसेस, अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या वाढतात.
6/9
याशिवाय नाश्ता टाळल्याने दुपारी किंवा संध्याकाळी अधिक खाण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे वजन वाढू शकतं.
7/9
मेंदूला योग्य पोषण न मिळाल्यामुळे स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता यावरही परिणाम होतो.
8/9
दिवसाच्या सुरूवातीला प्रथिनं, फायबर आणि नैसर्गिक साखरयुक्त पदार्थांचा समावेश असलेला नाश्ता करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola