थायरॉईडची समस्या महिलांमध्ये जास्त का दिसते?

महिलांमध्ये थायरॉईडचा धोका पुरुषांच्या तुलनेत अधिक असतो.

Continues below advertisement

थायरॉईड

Continues below advertisement
1/9
थायरॉईडची समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसण्यामागे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या शरीरात वारंवार होणारे हार्मोनल बदल.
2/9
मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचे शारीरिक बदल आणि रजोनिवृत्ती या सर्व टप्प्यांमध्ये हार्मोन्स मोठ्या प्रमाणात बदलतात, ज्याचा थायरॉईड ग्रंथीवर थेट परिणाम होतो.
3/9
महिलांमध्ये ऑटोइम्यून विकारांची शक्यता पुरुषांपेक्षा अधिक असल्याने हाशिमोटो थायरॉईडायटिस किंवा ग्रेव्ह्स डिसीज सारखे विकार महिलांमध्ये जास्त दिसतात.
4/9
गर्भधारणेदरम्यान थायरॉईड हार्मोन्सची गरज वाढते आणि प्रसूतीनंतर काही महिलांमध्ये पोस्ट-पार्टम थायरॉईडायटिस विकसित होतो
5/9
भारतातील काही भागांमध्ये आयोडीनची कमतरता असल्याने महिलांमध्ये Hypothyroidismचे प्रमाण वाढते
Continues below advertisement
6/9
त्यासोबतच काम, घर आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांमध्ये ताणतणावाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे हार्मोनल imbalance होतो आणि थायरॉईडचे कार्य बिघडू शकते.
7/9
आनुवंशिकता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे कुटुंबात थायरॉईडचा इतिहास असल्यास महिलांमध्ये हा धोका अधिक वाढतो
8/9
या सर्व कारणांमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना थायरॉईडची समस्या जास्त प्रमाणात भेडसावते.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola