Eyecare: सकाळी उठल्यावर डोळ्यांतून पाणी येणं हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे? जाणून घ्या…
Eyecare: सकाळी उठल्यावर अनेकांच्या डोळ्यांतून पाणी येतं. हलकं पाणी येणं सामान्य असलं तरी ही समस्या दररोज होत असेल तर ती नक्कीच दुर्लक्षित करू नये.
Continues below advertisement
Eyecare
Continues below advertisement
1/10
सकाळी डोळ्यांतून पाणी येणे म्हणजे तुमच्या डोळ्यांना इन्फेक्शन, अॅलर्जी, जळजळ किंवा अश्रू वाहण्याच्या नलिकेत अडथळा असल्याचे लक्षण असू शकते.
2/10
वारंवार डोळे पाणावणे तुमच्या दैनंदिन कामावर आणि दृष्टीवर परिणाम करू शकते. त्यामुळे कारण वेळीच ओळखणं आणि योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
3/10
सकाळी सतत पाणी येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. सर्वात सामान्य म्हणजे ड्राय आय सिंड्रोम डोळे रात्रभर कोरडे पडतात आणि सकाळी उघडल्यावर अचानक जास्त पाणी येऊ लागते.
4/10
अॅलर्जीक कंजंक्टिवाइटिस हे आणखी एक कारण आहे. धूळ, घाण, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा मेकअप उत्पादनांमुळे ही अॅलर्जी होते. यात डोळे पाणावणे, खाज सुटणे आणि लाल होणे अशी लक्षणे दिसतात.
5/10
झोपण्यापूर्वी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.
Continues below advertisement
6/10
स्क्रीन टाईम कमी करा आणि डोळ्यांना वारंवार विश्रांती द्या.
7/10
अॅलर्जी टाळण्यासाठी धूळ, धूर आणि जोरदार वाऱ्यापासून डोळ्यांचे रक्षण करा.
8/10
नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध किंवा आयड्रॉप्स वापरू नका.
9/10
पौष्टिक आहार घ्या, विशेषतः व्हिटॅमिन A आणि ओमेगा-3 असलेले पदार्थ खा.
10/10
(टीप: वरील माहिती केवळ माहितीसाठी आहे. एबीपी माझा यातील कोणताही दावा करत नाही.)
Published at : 24 Nov 2025 05:05 PM (IST)