Shakun Apshakun: मांजरीचे रडणं अशुभ असते का? जाणून घ्या सविस्तर
कुत्रा, गाय, म्हैस याबरोबरच मांजरही पाळीव प्राणी आहे. बरेच लोक घरी मांजर पाळतात. पण,जे मांजर पाळत नाहीत त्यांच्या घरीही मांजरी येतात. परंतु, घरी मांजरीचे आगमन शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंधित आहे. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमांजरींबद्दल अनेक समज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे सामान्यतः लोक मांजरीला शुभ मानत नाहीत. काही लोक मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक मानतात.(Photo Credit : Pixabay)
मांजरीला नकारात्मक उर्जेचा स्रोत देखील म्हटले जाते. धार्मिक शास्त्रांमध्येही घरात मांजर येण्याशी संबंधित शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली आहेत.(Photo Credit : Pixabay)
जर अचानक तुमच्या घरात काळी मांजर येऊ लागली तर ते खूप अशुभ मानले जाते. काळी मांजर घरात येताच, काळी मांजर रस्ता ओलांडणे, काळी मांजर तुमच्यावर आदळणे, काळी मांजर तुमच्यावर हल्ला करणे इत्यादी जीवनात येणाऱ्या संकटाचे प्रतीक आहे. घरी काळ्या मांजरीचे आगमन देखील नकारात्मक शक्तींची उपस्थिती दर्शवते.(Photo Credit : Pixabay)
दुसरीकडे, जर तुमच्या घरी अचानक पांढर्या रंगाची मांजर आली तर ते खूप शुभ मानले जाते. पांढरी मांजर शुभाचे प्रतीक मानली जाते. (Photo Credit : Pixabay)
असे मानले जाते की एक पांढरी मांजर तिच्याबरोबर नशीब आणते. त्याचबरोबर घरात पांढऱ्या रंगाची मांजर आल्याने नकारात्मक ऊर्जाही निघून जाते.(Photo Credit : Pixabay)
घरी मांजरीचे पिल्लू जन्मणे : घरी मांजरीचे पिल्लू जन्म देणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते. या चिन्हाचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरी शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते.(Photo Credit : Pixabay)
घरी मांजर रडणे : घरात मांजर रडणे अशुभ मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी मांजराच्या रडण्याचा आवाज आला तर ते अशुभ लक्षण मानले जाते. मांजराच्या रडण्याचा आवाज जर अनेक दिवस सतत येत असेल तर ते मोठे संकट येण्याची चिन्हे आहेत.(Photo Credit : Pixabay)
घरात मांजराचा मृत्यू : जर तुमच्या घरी मांजराचा मृत्यू झाला तर ते खूप अशुभ लक्षण आहे. याशिवाय मांजरीला कधीही मारू नका. मांजरीला मारणाऱ्या व्यक्ती सोबत अशुभ घडू शकते. (Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)