Halloween 2025: भारतात वाढतंय हॅलोविनचं क्रेझ! जाणून घ्या याचा इतिहास आणि महत्त्व...

Halloween 2025 : दरवर्षी 31 ऑक्टोबरला हॅलोविन साजरा केला जातो.आज जगभरात हॅलोविन खूप उत्साहात साजरा केला जातो. सोशल मीडियावरसुद्धा याचा ट्रेंड चालू आहे.

Continues below advertisement

Halloween 2025

Continues below advertisement
1/8
त्याची मुळे जवळजवळ 2000 वर्षे जुन्या सेल्टिक उत्सव समहेनमध्ये आहेत, जिथे असे मानले जात होते की मृतांचे आत्मे 31 ऑक्टोबरच्या रात्री पृथ्वीवर परत येतात. म्हणूनच 31 ऑक्टोबरला जगभरात हॅलोविन म्हणून साजरा केला जातो.
2/8
हॅलोविनची सुरुवात युरोपातील प्राचीन सेल्टिक समुदायांमध्ये झाली. तो शेतीशी संबंधित होता, म्हणूनच कापणीनंतरच्या आणि हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळाला समहेन असे म्हणतात.
3/8
लोकांचा असा विश्वास होता की या रात्री जिवंत माणसं आणि मृत आत्म्यांमधला पडदा सर्वात पातळ असतो म्हणजे दोघांमध्ये फारच कमी अंतर राहतं.. ते त्यांच्या घराबाहेर शेकोटी पेटवतात, मुखवटे (मास्क) घालतात आणि आत्म्यांना शांत करण्यासाठी बाहेर अन्न ठेवतात.
4/8
नंतर, ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असताना, 1 नोव्हेंबर हा दिवस ऑल सेंट्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि त्याच्या आदल्या रात्रीला ऑल हॅलोज इव्ह म्हटले गेले, जे नंतर हॅलोविन बनले.
5/8
कालांतराने हा सण भीती आणि अंधश्रद्धेच्या सणापासून उत्सव आणि अभिव्यक्तीच्या सणात विकसित झाला.
Continues below advertisement
6/8
प्राचीन काळात हा सण जीवन आणि मृत्यू यांच्यातील संतुलनाचे प्रतीक होता. पण आधुनिक युगात, त्या भीतीला कला, सर्जनशीलता आणि आत्म-अभिव्यक्तीमध्ये रूपांतरित करण्याचे माध्यम बनले आहे.
7/8
भारतात हॅलोविन पारंपरिक सण नाही, पण गेल्या काही वर्षांत याचा प्रभाव वाढला आहे. सोशल मीडिया, हॉलिवूड चित्रपट आणि जागतिक फॅशन कल्चरमुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला आहे.
8/8
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola