Ghost Resignation म्हणजे काय? Gen Z मध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

Gen Z मध्ये Ghost Resignation ही संकल्पना सध्या खूप चर्चेत आहे.

Continues below advertisement

Ghost Resignation

Continues below advertisement
1/9
आजच्या आधुनिक युगात, ऑफिस संस्कृतीत अनेक बदल होत आहेत. कामाच्या ठिकाणी फक्त कामच नाही, तर संवाद, मूल्यव्यवस्था आणि मानसिक आरोग्यालाही तितकंच महत्त्व दिलं जातं.
2/9
याच पार्श्वभूमीवर एक नवा आणि चिंताजनक ट्रेंड पुढे येतोय तो म्हणजे "Ghost Resignation", विशेषतः Gen Z म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या पिढीत हा चर्चेत आहे.
3/9
Ghost Resignation" म्हणजे एखादा कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणाशीही न बोलता, एके दिवशी नोकरीवरून अचानक गायब होतो. ना मेल, ना कॉल, ना नोटीस – अगदी “घोस्ट” झाल्यासारखा!
4/9
पूर्वी नोकरी सोडताना एक औपचारिक प्रक्रिया असायची. पण आता काही कर्मचारी थेट निघून जातात, आणि कंपनीला कळतंही नाही की त्यांनी नोकरी का सोडली.
5/9
Gen Z मध्ये हा ट्रेंड का वाढतोय? Gen Z ही पिढी कामाच्या ताणापेक्षा स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देते. जर ऑफिसचे वातावरण नकारात्मक असेल, तर ते तिथे थांबणं योग्य समजत नाहीत.
Continues below advertisement
6/9
या पिढीला एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करणं जुनी गोष्ट वाटते. नवीन संधी मिळाल्यावर ते लगेच निर्णय घेतात, काही वेळेस कोणालाही न सांगता!
7/9
Gen Z ला टेक्स्टवर बोलणं सोपं वाटतं, पण कठीण संवाद, जसं की राजीनामा देणं. या गोष्टी टाळण्याकडे कल असतो.
8/9
स्वतंत्र काम, फ्रीलान्सिंग, युट्यूब, इत्यादी पर्याय Gen Z साठी अधिक आकर्षक वाटतात, जेव्हा ऑफिसमधील काम समाधान देत नाही, तेव्हा ते थेट निघून जातात.
9/9
Ghost Resignation ही फक्त एक ट्रेंड नाही, तर ही बदलत्या कार्यसंस्कृतीची खूण आहे. Gen Z कामाला “फक्त पगारासाठी” न पाहता, त्यात अर्थ, मूल्य, आणि आत्मसंतोष शोधते. हा बदल समजून घेणं ही काळाची गरज आहे, कर्मचार्‍यांनीही आणि कंपन्यांनीही.
Sponsored Links by Taboola