Child health:लहान मुलांना दूध प्यायल्यावर जुलाब का होतात, काय आहे कारण?
Child Health: दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजचे पचन करण्यासाठी, लॅक्टेज नावाचे एन्झाइम आवश्यक असते, जे मुलांच्या लहान आतड्यात तयार होते. जर शरीरात हे एन्झाइम अजिबात तयार न झाल्यास दूध पचत नाही
Continues below advertisement
Child Health(Pic credit: unsplash)
Continues below advertisement
1/15
दूध हे मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं ; तरी काही लहान मुलांना याचे सेवन केल्यानंतर याचा त्रास होतो
2/15
दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजचे नावाचे एन्झाइम पचन करण्यासाठी आवश्यक असते, जे लहान आतड्यात तयार होते.
3/15
जर शरीरात हे एन्झाइम अजिबात तयार नाही झाल्या तर दूध पचत नाही, आणि ते मोठ्या आतड्यात जाते आणि तिथेच कुजू लागते
4/15
यामुळेच अतिसार, गॅसेस, पोट फुगणे, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते.
5/15
दुग्धशर्करा म्हणजेच दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी साखर पूर्णपणे पचवता येत नाही.
Continues below advertisement
6/15
लॅक्टोज् इनटॉलरन्सची लक्षणे सामान्यत: लॅक्टोज-युक्त पदार्थ किंवा पेये खाल्ल्यानंतर काही तासांत दिसून येतात.
7/15
ही स्थिती एक ॲलर्जी नसून पचन समस्या आहे आणि ती वयानुसार बदलणारी किंवा संसर्गजन्य आजारांमुळे लहान आतड्याला झालेल्या नुकसानामुळे प्रभावित होऊ शकते.
8/15
लॅक्टोजन इनटॉलरन्स ही एक चिंताजनक समस्या आहे जी वेळेवर सोडवली पाहिजे,परंतु मोठ्या संख्येने मुलांना इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS),सेलिआक रोग किंवा फुड ऍलर्जी यासारख्या इतर पचन विकारांना तोंड द्यावे लागते
9/15
लॅक्टोज इनटॅालरन्ससाठी, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लॅक्टोज इनटॅालरन्स चाचणी करणे गरजेचे आहे. स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नका
10/15
ज्या मुलांना लॅक्टोज इनटॅालरन्स आढळून आला त्यांना पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी घेण्याचा सल्ला दिला जाईल.
11/15
जंक फुड, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन मर्यादित करा आणि तज्ञांनी दिलेल्या आहारातील बदलांचे पालन करा.
12/15
प्रतिबंधात्मक उपायांमध्ये निरोगी आतड्याच्या सूक्ष्मजीवांना प्रोत्साहन देण्यासाठी फळे, भाज्या आणि तृणधान्य समृद्ध संतुलित आहाराची निवड करा.
13/15
पचन समस्यांचा धोका असलेल्या मुलांसाठी, नियमित तपासणी वेळीच निदान आणि उपचारास मदत करू शकते
14/15
पालकांनी त्यांच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे
15/15
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 04 Oct 2025 01:55 PM (IST)