सतत पाय क्रॉस करून बसता? जाणून घ्या त्याचे गंभीर दुष्परिणाम!
य क्रॉस केल्याने तात्पुरता रक्तदाबही वाढू शकतो आणि व्हेरिकोज वेन्सची समस्या असल्यास ती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे पाय सरळ ठेवून बसणे, हालचाल वाढवणे आणि योग्य पोस्चर राखणे आवश्यक आहे.
Continues below advertisement
सतत पाय क्रॉस करून बसता?
Continues below advertisement
1/8
सतत पाय क्रॉस करून बसल्याने शरीरावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
2/8
पाय एकावर एक ठेवून बसल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही, त्यामुळे पायात मुंग्या येणे, सुन्नपणा किंवा सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
3/8
या स्थितीत नसा दाबल्या जाण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे पेरोनिअल नर्व्हवर ताण येऊन पायात टोचल्यासारखे वाटू शकते.
4/8
पाय क्रॉस केल्याने तात्पुरता ब्लड प्रेशरही वाढू शकतो.
5/8
यामुळे पाठ, कंबर आणि मणक्यावर अनावश्यक ताण येत असल्याने पोस्चर बिघडणे, पाठदुखी किंवा कंबरदुखी वाढण्याची शक्यता असते.
Continues below advertisement
6/8
तसेच हे बसणं कूल्हे आणि मांड्यांवर अतिरिक्त दाब आणत असल्याने स्नायूंचा असंतुलनही होऊ शकतो.
7/8
ज्यांना व्हेरिकोज वेन्सची समस्या आहे, त्यांच्यात ही सवय समस्या अधिक वाढवू शकते.
8/8
त्यामुळे पाय सरळ ठेवून बसणे, वेळोवेळी उभे राहून चालणे आणि स्ट्रेचिंग करणे अधिक योग्य ठरते.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 02 Dec 2025 04:08 PM (IST)