PHOTO: पांढरा राईस की ब्राऊन राईस? जाणून घ्या दोघांमध्ये काय फरक आहे..
पांढरा तांदूळ आणि ब्राऊन तांदूळ. तांदळाचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु बहुतेक लोकांना त्यांच्यातील फरक माहित नाही. या दोन्ही प्रकारच्या तांदळाची माहिती घेऊया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपांढरा तांदूळ बनवण्यासाठी भुसा काढून भाताचे दाणे तयार केले जातात, त्यामुळे बहुतेक पोषक तत्वेही निघून जातात. परंतु यामुळे, पांढरा तांदूळ बराच काळ ठेवता येतो, आणि शिजवल्यानंतर मऊ होतो.
दुसरीकडे, ब्राऊन तांदूळ हा संपूर्ण धान्याचा तांदूळ आहे, ज्याचा कोंडा काढला जात नाही. पांढर्या तांदळापेक्षा ब्राऊन तांदूळ चवदार असतो. कारण त्यात जास्त फायबर असते, पण ब्राऊन तांदूळ शिजायला जास्त वेळ लागतो आणि पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत कमी वेळ ठेवता येतो.
पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन तांदूळ चांगला मानला जातो. संपूर्ण धान्यामध्ये धान्याचे तीनही भाग असतात, कोंडा हा धान्याचा सर्वोत्तम भाग असतो आणि त्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
ब्राऊन तांदूळ हा फायबर, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे.
याउलट, पांढरा तांदूळ हे परिष्कृत धान्य आहे. ज्यामध्ये कोंडा काढून टाकण्यात आला आहे, यामुळेच त्यामध्ये ब्राऊन राइसच्या तुलनेत फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असतात.
पांढर्या तांदळापेक्षा ब्राऊन तांदूळ चवदार आणि चघळायला सोपा असतो. त्यामुळे ती वृद्धांची पहिली पसंती बनली आहे.
ब्राऊन तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो, त्याचा एक मोठा फायदा आहे की ते पांढर्याच्या तुलनेत रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखरेसारख्या समस्यांनी ग्रस्त लोक ते रोज खाऊ शकतात.
दुसरीकडे, ब्राऊन तांदूळ कमी कॅलरीमुळे, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ते चांगले आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (सर्व फोटो सौजन्य :unsplash.com/)